दापोली प्रतिनिधी
तालुक्यातील वळणे येथील विहिरीत पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबत दापोली पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, राजू राठोड (22) हा वळणे एमआयडीसीजवळील झोपडपट्टीत रहात होता. 30 नोव्हेंबरला दुपारी 2 च्या सुमारास बाहेर जात असल्याचे त्याच्या शेजाऱयांनी बघितले होते. त्यानंतर तो घरी न परतल्याने त्याच्या शोध सुरु केला. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 च्या सुमारास राजू राहत असलेल्या झोपडीजवळील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.