रत्नागिरी : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackre ) रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आपल्या जहीर भाषणात त्यांनी शिंदे- भाजप सरकारवर हल्लाबोल करून नविन सरकार सत्तेत आल्यापासून एकही जनतेच्या हिताच काम या सरकारनं केलं नाही. डबल इंजिंन सरकारचे एक इंजिन बंद पडले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाचे श्रेय लाटले आहे. या चाळिस आमदारांनी धाडस दाखवून आपला राजिनामा द्यावा आणि निवडणुकिला सामोरे जावे असहि आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले.
आपल्या भाषणात शिंदे सरकारवर टिका करताना ” हे खोके सरकार एकही चांगले काम करू शकले नाही. या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्य़ा कामाचं श्रेय लाटलं आहे. विधानमंडळाच्या दारात तुम्हालाही खोके पाहिजेत का? असा उलटप्रश्न केला गेला. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आम्हाला गद्दार म्हणू नका असा निरोप दिला जातो असा निरोप देण्यापेक्षा त्यांनी आपल्या आमदारकीचा राजिनामा द्यावा.” असे आवाहन केले.
वेदांता- फॉक्सकॉन (Vedant-Foxconn) प्रकरणावर खुलासा करताना आदित्य ठाकरे म्हणाले “1 लाख 50 हजार काटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच मंत्री प्रयत्न करत होते. आम्ही सगळेच अनिल अगरवाल यांच्याशी चर्चा करत होतो. डबल इंजिनचं सरकार असताना हा प्रकल्प गेला आहे. डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झालं आहे.”
उद्योगमंत्री उदय सामंतांवर टिका करताना आदित्य ठाकरे म्हणाले,”उद्योग मंत्र्यांनी फक्त शिवसेनेशी गद्दारी नाही तर महाराष्ट्राशी केली आहे. एव्हढा मोठा प्रकल्प राज्यातून गेलाच कसा ? बल्क ड्रग प्रकल्पसुद्धा अशाच निष्काळजीपणाने गेला पण उद्योग मंत्र्यांना याची कल्पनाच नाही. प्रकल्प गेल्यामुळे उद्योगमंत्री राजीनामा देणार आहेत काय ?” असा प्रश्न राज्यसरकारला आदित्य ठाकरे यांनी विचारला.
Trending
- Sangli Breaking : तासगावात चाकूने पाच वार करून तरुणाचा खून.
- 350 व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
- माणसातला देवमाणूस ! डॉ . ज्ञानेश्वर दुर्भाटकर
- Ratnagiri Breaking : जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात तिघांना जन्मठेप
- सिमेंट- मिक्सर ट्रकची कारला धडक ७ जखमी; जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश
- कोल्हापूरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
- गोल्याळी फाट्यानजीक बस -दुचाकीची धडक; चार जण गंभीर जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ रोजी हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्गात !