वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
810 चिपसेटसह येणारा रियलमी 9आय 5-जी स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. साधारणपणे याची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत असणार असल्याची माहिती आहे.
5-जी सेवेसह येणारा हा अफोर्डेबल गटातला स्मार्टफोन मानला जात आहे. रेडमी, मोटोरोला व सॅमसंग यासारख्या फोन्सना तो टक्कर देईल. 810 5-जी प्रोसेसर असून 5-जी सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. 187 ग्रॅमचे वजन असणारा फोन 8.1 मि. मी. जाडीचा आहे. 6.6 इंच डिस्प्ले, फुल एचडी प्लससह हा फोन सादर झाला आहे. 5 हजार एमएएचची बॅटरी, 50 एमपीचा कॅमेरा व इतर सुविधा यात असतील. 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोअरेजचा फोन 14 हजार 999 रुपयांना व 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोअरेजचा फोन 16 हजार 999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

कधीपासून विक्रीला?
सदरचा स्मार्टफोन नुकताच लाँच झालेला असला तरी तो 24 ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध होईल.
फिचर्स पाहुया
प्रोसेसर- 810 5-जी प्रोसेसर
रिप्रेश रेट- 90 हर्टत्झ्
बॅटरी- 5000 एमएएच,
42 तासांची कॉलिंगची सुविधा
कॅमेरा- ट्रिपल- 50 एमपी प्रायमरी व 8 एमपी प्रंट
अँड्रॉईड 12, युआय 3.0
चार्जर- 18 डब्ल्यूची फास्ट चार्जिंग सुविधा