नारजो एन 53 लवकरच ग्राहकांच्या हाती : 18 मेला लाँच होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी तंत्रज्ञान कंपनी रियलमी ‘नारजो एन 53’ हा नवा स्मार्ट फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. सदरचा फोन 18 मे रोजी लाँच केला जाणार असल्याचे समजते. आतापर्यंतचा हा सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
33 डब्ल्यूचा फास्ट चार्जर असणार असून 5000 एमएमएचची दमदार बॅटरी यात असेल, असे सांगितले जाते. चार्जर वेगवान असल्याने 30 मिनिटात 50 टक्के बॅटरी चार्ज होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. सदरचा फोन 90 हर्टझ रिफ्रेश रेटसह येणार असून 6.72 इंचाचा डिस्प्ले याला असेल. मीडियाटेक हेलियो 80 प्रोसेसरसह अँड्रॉईAड 13 आधारित युआय ऑपरेटिंग सिस्टमसह फोन येणार आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा यात असणार आहे. 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही सोबत मिळणार आहे.
महत्त्वाच्या बाबी….
नारजो एन 53
6.7 इंचाचा डिस्प्ले, 33 केडब्ल्यूचा चार्जर
मीडियाटेक हेलियो 80 प्रोसेसर
13 हजार रुपये किमत
50 मेगापिक्सलचा
कॅमेरा
सदरच्या फोनची किंमत 13 हजार रुपयांपर्यंत असू शकते, असे म्हटले जात आहे. ब्लू टूथ, जीपीएस, एनएफसी, एन डिस्प्ले, फिंगर प्रिंटसह हा फोन येईल. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर व अॅमेझॉनवर सदरचा नवा स्वस्तातला फोन विक्रीकरता उपलब्ध होणार आहे.