ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi sunak) boris johnson यांचा ब्रिटनचे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Former PM britain Boris Johnson) यांनी रविवारी ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्यास नकार दिला. तसेच सुनक यांना पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी त्यांना पुरेशा खासदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जॉन्स यांनी एका निवेदनात म्हटले की, मला कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांसह निवडणुकीत यशस्वी होण्याची खूप चांगली संधी आहे. परंतु हे असे करणे योग्य होणार नाही कारण सुनक यांना अधिक पाठींबा आहे.
ब्रिटनमध्ये लिझ ट्रस (Liz Truss) यांच्या राजीनाम्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. बोरिस जॉन्सन हे भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेण्यास सांगतील अशा चर्चा होत्या. मात्र आता त्यांनी स्वत:चं नाव मागे घेतलं आहे. तर ऋषी सुनक यांना एका खासदाराने पंतप्रधानपदासाठी आव्हान दिलं आहे. मात्र तरीही राजकीय समीकरण सुनक यांच्या बाजूने दिसत आहे.

बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, त्यांच्याकडे १०२ खासदारांचा पाठिंबा आहे. मात्र त्यांच्यासाठी ही योग्य वेळ नाही. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आता ऋषी सुनक आणि पेनी मोर्डोंट हे आहेत. तर पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या ऋषी सुनक यांना आतापर्यंत १४७ खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.