क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य लॉ विद्यापीठ आयोजित विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या राजा लखमगौडा लॉ संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
बेंगळूर येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील 18 फुटबॉल संघांनी भाग घेतला होता. पहिल्या सामन्यात बीव्हीडी कॉलेज दावणगिरीचा 3-0 असा पराभव केला. त्यामध्ये आरएल लॉतर्फे तेजस इंचलने 2 तर तुषार पवारने 1 गोल केला. उपांत्यपूर्व फेरी सामन्यात आरएल लॉ महाविद्यालयाने मंगळूर संघाचा 1-0 असा पराभव केला. तेजस इंचलने एकमेव गोल केला. उपांत्य फेरीत बेंगळूर संघाकडून आरएल लॉ संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात आरएल लॉ संघाने जेएसएस संघाचा 5-1 असा पराभव केला. आरएल लॉतर्फे तुषार पवारने 2, तेजस इंचलने 2 तर चाणक्यने 1 गोल केला.
या संघात तेजस इंचल (कर्णधार), अमोल शिंदे, शुभम तुषालपूर, दुर्गाप्रसाद पाटील, तुषार पवार, आकाश सरदेशपांडे, साई मजुकर, वृषभ लेंगडे, पुरुषोत्तम व•र, रवीतेज हिरेमठ, रणचोद शहापूरकर, चाणक्य सामण्णावर, मतीन पिरजादे, तुषार चव्हाण पाटील, आर. एन. बागी आदी खेळाडूंचा समावेश आहे.
तिसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व कांस्यपदके देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, झिमखाना चेअरमन प्रसन्न कुमार, साहाय्यक क्रीडा प्राध्यापक अमित जाधव यांनी या संघाचा गौरव केला. केएलएस सोसायटीचे चेअरमन आनंद मंडगी, पी. एस. सावकार, एम. आर. कुलकर्णी आदी संचालकांनी त्यांचे कौतुक केले आहे.