प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पालिका क्षेत्रातील एकूण दहाही प्रभागातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते पावसाळय़ापूर्वी हॉटमिक्स केले जाईल, अशी माहिती पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली
पेडणे पालिका क्षेत्रातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स कामाचा शुभारंभ 18 रोजी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी पेडणे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, उपनगराध्यक्ष तृप्ती सावंत देसाई, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका राखी कशाळकर, नगरसेविका अश्विनी अरुण पालयेकर, नगरसेवक बाप्पा उर्फ विष्णू साळगावकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, उद्योजक रुदेश नागवेकर,आनंद सावळ देसाई ,संजय पालयेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पुढे बोलताना पेडणेच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असून जरी विकास कामांना उशीर झाला असेल तरीही कामे मार्गी लावली जातील. या रस्त्यांचे हॉटमिक्स मागच्या दोन वर्षांपूर्वी होणे आवश्यक होते. परंतु, काहींनी या रस्त्यांच्या फाईल्स दाबून ठेवल्यामुळे त्याला गती मिळाली नाही, असा दावा आमदार प्रवीण आलेकर यांनी केला.
नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांनी आमदार प्रवीण आर्लेकर आणि सरकारच्या सहकार्यातून पेडणेतील अंतर्गत रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण होत आहे. पालिका क्षेत्रातील नागरिकांना चांगले रस्ते देण्यासाठी सरकार आणि पालिका कटिबद्ध आहे, असे सांगितले.