क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक रोहन कोकणे याचा मराठा युवक संघातर्फे स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खास सत्कार करण्यात आला.
रोहनचा सत्कार माननीय किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी बेळगावमधील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करून बेळगावचे नाव जगाच्या कानाकोपऱयात पोहोचवावे, असा संदेश दिला. बेळगाव येथे मराठा युवक संघातर्फे त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, उमेश कलघटगी, सचिव चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, दिनकर घोरफोडे, शिवाजी हांगिरगेकर, अप्पासाहेब गुरव, कन्नूभाई ठक्कर, रमेश हन्नीकेरी, अजित कोकणे, शिवाजी हंडे, नारायण किडवाडकर, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव, शेखर हंडे, सूर्यकांत हिंडलगेकर, गणेश दड्डीकर, स्केटिंगपटू व पालक उपस्थित होते.