कर्नाटक अन् महाराष्ट्रातील शहरांचा समावेश ः रस्ते परिवहन मंत्रालयाचा पुढाकार
@वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रस्ते परिवहन मंत्रालय देशातील वाहतुकीची सुविधा अधिक चांगली व्हावी या उद्देशाने अनेक शहरांमध्ये रोपवे चालविण्याची तयारी करत आहे. रोपवे निर्माण करणारी कंपनी नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेडकडे अनेक राज्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ही कंपनी एनएचएआयशी संबंधित आहे. यातील 4 प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून 18 प्रकल्पांसाठीच्या निविदा लवकरच जारी केल्या जाणार आहेत.

रस्ते परिवहन मंत्रालय रस्तेनिर्मितीसह लोकांना वाहतुकीची अन्य साधने उपलब्ध करविण्याची तयारी करत आहे. याचाच विचार करत एनएचएआयने नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी निर्माण केली असून तिच्यामार्फत देशभरात रोपवे तयार केले जाणार आहेत. कंपनीने आतापर्यंत चार ठिकाणी रोपवे प्रकल्पावर काम देखील सुरू पेले आहे.
उत्तरप्रदेशात वाराणसी, उत्तराखंडमध्ये केदारनाथ आणि हेमकुंड साहिब येथे रोपवे निर्मितीसंबंधी प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरता निविदाही काढण्यात आली आहे. वाराणसी प्रकल्पावर चालू वर्षी काम सुरू होणार आहे. गाजियाबादमधील प्रकल्पासाठी निविदा लवकरच काढली जाईल. अन्य प्रकल्पांवरही काम सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे.
अनेक राज्यांमधून प्रस्ताव
आतापर्यंत अनेक राज्यांमधून रोपवेसंबंधी 200 च्या आसपास प्रस्ताव मिळाले ओत. यातील अनेक प्रस्तावांवर एनएचएलएमएल लवकरच निर्मितीप्रक्रिया सुरू करणार आहे. प्रस्ताव पाठविणाऱया राज्यांमध्ये कर्नाटक, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, आंध्र, मध्यप्रदेश, लेह-लडाख, महाराष्ट्र तसेच ईशान्येतील राज्यांचा समावेश आहे.
18 ठिकाणांसाठी लवकरच निविदा
आंध्रप्रदेश ः विजयवाडा, कन्नूर
महाराष्ट्र ः पुणे, त्र्यंबकेश्वर,
मध्यप्रदेश ः उज्जैन
कर्नाटक ः उडुपी, कोप्पळ, चिकबळ्ळापूर
जम्मू-काश्मीर ः अनंतनाग, रेआसी
लडाख ः लेह
हिमाचल प्रदेश ः कुल्लू
उत्तराखंड ः उत्तरकाशी, चंपावत
सिक्कीम ः गंगटोक
मणिपूर ः विष्णूपूर
अरुणाचल प्रदेश ः डपोरीजो