आपला चेहरा तेजस्वी ,तजेलदार असावा असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी बरेच जण पार्लर मध्ये ट्रीटमेंट घेतात .किंवा बाजारातील अनेक क्रीम्सचा वापर करतात. बऱ्याच वेळेला याचा विपरीत परिणाम देखील दिसून येतो. यामुळे घरच्या घरी गुलाब पाण्याचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य कसं खुलवू शकता. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यावर गुलाब पाणी लावल्यास तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. त्याचबरोबर त्वचेची जळजळ होत असेल किंवा खाज सुटत असेल तर त्यावर गुलाबपाणी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचा आणखी तजेलदार दिसते. गुलाबपाण्यामध्ये अँटीऑक्साईड घटक असल्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. गुलाब पाणी क्लीन्जर म्हणूनही काम करते. यामुळे आपल्या त्वचेवरील घाण, मळ काढून टाकण्यास मदत होते. जर डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी कापसाचा बोला गुलाब पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवावा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. चेहऱ्यावरील डाग,मुरूम घालवण्यासाठी गुलाब पाणी अतिशय लाभदायक आहे. दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी गुलाब पाणी आपल्या चेहऱ्याला लावल्यास नक्की फायदा होतो.
Previous Articleसुरक्षा काढून घेण्यामागे राजकीय रंग; सतेज पाटलांचे टीकास्त्र
Next Article नाथपंथी डवरी समाजाचा उद्या कोल्हापुरात महामेळावा
Related Posts
Add A Comment