अनेक जण मारले गेल्याची भीती ः रिफायनरी अन् ऊर्जा निर्मिती पेंद्र नष्ट
रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या 5 रेल्वेस्थानकांना लक्ष्य केले असून या हल्ल्यांमध्ये अनेक जण मारले गेल्याची भीती आहे. मध्य आणि पश्चिम युक्रेनमधील रेल्वेस्थानकांवर हल्ले करण्यात आले. तर क्रिमेनचुक भागात रशियाच्या सैन्याने एका रिफायनरी आणि ऊर्जानिर्मिती केंद्रावर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत. या हल्ल्यात मोठे नुकसान होण्यासह एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.
रशियाच्या सैन्याने मध्य युक्रेनच्या विनित्सिया क्षेत्रातील दोन भागांवरही रॉकेट हल्ले केले आहेत. मारियुपोलच्या अजोवस्टाल स्टील प्रकल्पात असलेल्या सैनिक आणि नागरिकांवर क्षेपणास्त्र आणि बॉम्बने हल्ले सुरूच आहे. प्रकल्पात सुमारे दोन हजार युक्रेनियन सैनिक आणि एक हजार नागरिक अडकून पडले आहेत. नागरिकांनी युक्रेन सरकार आणि आंतरराष्ट्रीय जगताला मदतीची विनंती केली आहे. तर रशियाने या सर्वांना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे.

रशियाच्या यंत्रणांनी वरिष्ठ रशियन पत्रकार ब्लादिमीर सोलोवयोव यांच्या हत्येच्या कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा ब्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली. हत्येच्या कटात युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांच्या यंत्रणा सामील होत्या असे पुतीन यांनी म्हटले आहे. सोलोवयोव रशियाच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचे समर्थक होते.
रशियाच्या ब्रांस्कमध्ये युक्रेनने डागली क्षेपणास्त्रs
रशिया-युक्रेन युद्धाला 2 महिन्यांहून अधिक काळ झाला असला तरीही याची धग कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. याचदरम्यान युक्रेनने रशियाच्या ब्रांस्क शहरावर हल्ला केला आहे. येथे युक्रेनच्या सैन्याने क्षेपणास्त्रs डागली असून यामुळे एक ऑइल डेपो उाध्वस्त झाला आहे.