ऑनलाईन टीम/ तरुण भारत
Andheri East Assembly Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा उमेदवारी अर्ज कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. ऋतुजा लटके या प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांना पहिल्यांदा महापालिकेच्या सेवेतील राजीनामा देणे क्रमप्राप्त आहे. परंतु महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाकडून अद्यापही तो मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या (Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय.
हे ही वाचा : ‘कोर्टाच्या बाहेर बसून तुला पत्र लिहितोय, आई मी नक्की परत येईन’; संजय राऊतांचे आईला भावनिक पत्र
दरम्यान, ऋतुजा लटके यांचा पालिका नोकरीचा राजीनामा अद्यापही स्वीकारण्यात आलेला नाही. याच कारणामळे आपल्या नोकरीचा राजीनामा न देताच त्या निवडणूक लढवत आहेत, असा आरोप केला जातोय. तर सर्व सोपस्कार पूर्ण करूनही प्रशासन राजीनामा मंजूर केलेला माही, असा आरोप उद्धव ठाकरे गट तसेच ऋतुजा लटके यांच्याकडून केला जातोय. या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर ऋतुजा लटके यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी प्रशासनास राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केलीय. या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणाराय.
