sada sarvankar : शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारले जाणार आहे.त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये वेगळं कार्यालय उभारणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली.नागरिकांच्य़ा समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई शहरातील समस्या सोडवण्यासाठी शिंदे यांचे कार्यालय दादरमध्ये उभा करणार आहोत. ज्याठिकाणी प्रत्येक नागरीक शिंदे यांना भेटतील. समस्या सोडवण्यासाठी एखादं प्रशस्त कार्यालय असावं अशी इच्छा आहे. कार्यालयाची जागा लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसात ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल तेथे काम सुरु होईल असेही ते म्हणाले. काम करण्यासाठी शिवसेना भवनचं हवं असं नाही. काम काम असतं असेही ते म्हणाले. या भवनाचं नाव काय निश्चित करायचं हे अजून ठरलं नसल्याचे त्यांनी सांगितले.
Related Posts
Add A Comment