बेळगाव : मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे भारतीय शरीरसौष्ठव संघटना व मध्यप्रदेश शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेसाठी बेळगावच्या सदानंद लक्ष्मण बडवाण्णाचे यांची कर्नाटक संघात निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजी व्यायामशाळेतर्फे खास गौरव करण्यात आला. कंग्राळ गल्लीचे रहिवाशी सदानंद लक्ष्मण बडवाण्णाचे (वय 65) यांचे मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. त्याबद्दल कंग्राळी गल्ली येथील छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेतर्पे विनायक निलजकर यांच्याहस्ते त्यांचा खास सत्कार करण्यात आला. सुरेश धामणेकर व सदानंद बडवाण्णाचे या ज्येष्ठ व्यायामपटूंनी गल्लीचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याबद्दल त्यांचा खास सत्कार करण्यात आला. सदानंद यांनी अनेक स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी सदानंद बडवाण्णाचे उज्जैनला रवाना होणार आहेत.
Previous Articleनिल इंडियन बॉईज हिंडलगा संघाकडे किरण जाधव चषक
Next Article बेळगावचा विकास सूर्यवंशी ‘मि.महाबला श्री’
Related Posts
Add A Comment