बेळगाव
बेळगाव अनिल बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित 6वी अनिल बेनके चषकषक निमंत्रितांची ऑल इंडिया टेनिस बॉल स्पर्धेत शनिवार खेळविण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यात बीआरडीएस संघाने बीम्स संघाचा 7 गडय़ांनी तर साहेबप्रेमी संघाने महानगरपालिका संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यात पहिल्या सामन्यात बीम्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 104 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीजेपी संघाने 8 षटकात 5 गडी बाद 69 धावा केल्या. हा सामना बीम्सने 36 धावांनी जिंकला. बीम्सच्या आनंदला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

दुसर्या सामन्यात अडव्होकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 57 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पत्रकार इलेव्हन संघाने 5.4 षटकात 59 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. दिपक राक्षेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

तिसर्या सामन्यात हेस्काम संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 7 गडी बाद 30 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीआरडीएस संघाने 4.3 षटकात 6 गडी बाद 34 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. प्रणय शेट्टीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
चौथ्या सामन्यात महानगरपालिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 4 गडी बाद 66 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फौजी संघाने 6 षटकात 6 गडी बाद 47 धावा केल्या. इिम्तहाजला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पाचव्या पत्रकार संघाने 6 षटकात 5 गडी बाद 48 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीआरडीएस संघाने 3.5 षटकात 2 गडी बाद 51 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. त्यात संतोष सुळगे पाटीलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पाfहल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महानगरपालिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 3 गडी बाद 49 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना साहेबप्रेमी संघाने 3.5 षटकात 3 गडी बाद 64 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. विनायक शानू याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बीम्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 5 गडी बाद 31 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीआयडीएस संघाने 2.5 षटकात 2 गडी बाद 34 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. प्रसाद नाकाडीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.