वार्ताहर /जुने गोवे
चोडण येथील रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने सत्तरी तालुक्मयातील वाळपयी येथील पाल धबधबा परिसरात पदभ्रमण आयोजित करण्यात आले होते. पाल गावातील महादेव मंदिराकडून धबधब्यापर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पदभ्रमण केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संदीप सावळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुजय हळर्णकर, जगन्नाथ घाटवळ, संतोष मळीक,ऋतूंबरा वेळुस्कर, मैथिली शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या पदभ्रमण मोहीमेत विशारद वेळुस्कर यांनी वाटेंत असणार्या विविध वनस्पतींची विद्यार्थ्यांना माहिती यावेळी दिली.