जोरदार वादळामुळे घरांचे आणि गोठ्याचे नुकसान
संगमेश्वर प्रतिनिधी
संगमेश्वर परिसर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गारांचा जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या वादळामुळे घरांचे आणि गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच आंब्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळासह संगमेश्वर परिसरात गारांचा पाऊस पडला. १ तास पडलेल्या गारांमुळे गारांचा खच जमा झाला होता तसेच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस आणि जोरदार वादळामुळे घरांची आणि दुकानांची मोठी पडझड झाली आहे. वादळामुळे तयार झालेला हापूस आंबा मोठया प्रमाणात पडला असून हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सहा वाजता थोडा कमी झाला मात्र गडगडाटी वातावरण आणि अधून मधून गारांचा वर्षाव सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे कामावर गेलेले कामगार तसेच शेतीवर गेलेले शेतकरी अडकून पडले होते.