Sangeli Sanamdev Bhajan Mandal stands first in Kariwade district level bhajan competition
कारिवडे पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेली येथील श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने (बुवा खेमराज सनाम) प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत पिंगुळी येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने (बुवा रुपेश यमकर) द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक माणगाव येथील नवतरुण युवक भजन मंडळाने (बुवा रोहन कुंभार) पटकाविला.
या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ- श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ(नेरुर) बुवा भार्गव गावडे, उत्कृष्ट गायक- खेमराज सनाम (सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली),उत्कृष्ट हार्मोनियमवादक बाळकृष्ण नाईक (अभंग महिला भजन मंडळ कुडाळ),उत्कृष्ट पखवाजवादक विनोद पालव (नवतरुण युवक भजन मंडळ माणगांव), उत्कृष्ट तबलावादक ओमकार तळवणेकर (सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली),उत्कृष्ट कोरस ओंकार महिला भजन मंडळ कोलवाळे, उत्कृष्ट झांज वादक प्राथमिक शिक्षक कला मंच प्रासादिक भजन मंडळ कुडाळ स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिप्तेश मेस्त्री आणि रुपेश पवार यांनी काम पाहिले.
ओटवणे प्रतिनिधी