जत न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील वळसंग रस्त्यावर एका महिलेला गावात सोडण्याच्या बहणाने ६५ हजार सोने व रोग रक्कमेची लुटमार व विनयभंग केल्याची घटना घडली होती. याबाबत जत पोलिसात विनयभंग व जबरी चोरी केल्याने मुनीर खतुबद्दीन नदाफ (वय .४६) (रा. नदाफ गल्ली जत) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची घटना १७सप्टेंबर २०१९ रोजी घडली होती.
पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपी नदाफ यास अटक केली होती. त्यानुसार तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांनी जत न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोषपत्र दाखल केले होते. न्यायालयाने नुकतेच आरोपी नदाफ यास भारतीय दंड संहिता कलम ३९२ (जबरी चोरी प्रकरणी) दोषी धरून तीन वर्षे सश्रम कारावास व २हजार दंड .दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद व कलम ३५४ कलमान्वये विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून जे. जे. पाटील यांनी काम पाहिले. महत्वपूर्ण निकालामुळे जबरी चोरी व विनयभंग करणाऱ्या आरोपींच्या मध्ये मनात धगधग निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी, शहरातून जाणाऱ्या जत वळसंग रस्त्यावर एका पेट्रोल पंपाच्या बाजूला २७ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी एका महिलेला गावात सोडतो आसे सांगून नेले होते दरम्यान संबधित महिलेला चाकूचा धाक दाखवून विनयभंग करून महिलेकडून ६० हजार रुपये च्या किमतीच्या सोन्याच्या दागिनेसह रोख ५हजार पाचशे रुपयाची लूट करण्यात आली होती.
तपास अतिशय गुंतागुंतीचा क्लिष्ट बनला होता पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही व पीडित महिलेने केलेल्या वर्णनानुसार आरोपी नदाफ यास अटक केले होते .सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते करत होते. यानुसार न्यायालयात दोषारोष पत्र दाखल केले होते न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील जे. जे पाटील यांनी आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी याबाबत युक्तिवाद केला होता यानुसार आरोपीस शिक्षा झाली आहे.