*माझा वेंगुर्ला चे सलग 6 व्या वर्षी यशस्वी आयोजन*
वेंगुर्ले (वार्ताहर)-
माझा वेंगुर्ला ‘ व लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव रानभाज्यांचा अंतर्गत प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धेत तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वेतोरे गावच्या सानिका सचिन नाईक यांनी शतावरीपासून बनविलेले शिरवळे यांस प्रथम क्रमांक, वेतोरे गावच्या सुमित्रा महेश सावंत हिने बनविलेल्या `कोरफडाच्या करंज्या व गोकर्णाचा चहा’ यांस व्दीतीय क्रमांक तर वेंगुर्लेच्या प्रियांका प्रकाश गावडे हिने बनविलेली `भरलेली फागली’ यांस तृतीय क्रमांक मिळाला. तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक वेंगुर्लेच्या संध्या सदानंद करंगुटकर हिने बनविलेल्या `सुरणाच्या हलवा’ या पदार्थास व द्वितीय क्रमांक वेंगुर्लेच्या श्रेया अजित रेडकर हिने बनविलेल्या `फातरीची भाजी व चाईच्या भाजीचे मोदक’ या पदार्थास मिळाला.