जयसिंगपूर (कोल्हापूर) : अपक्ष उमेदवाराच्या ऑफिसवर मोर्चा काढणे हे खूप दुर्दैवी आहे. अपक्ष असताना सुद्धा आम्ही शिवसेनेला त्यांना पाठिंबा दिला होता. गेल्या अडीच वर्षात शिवसेनेतील कोणत्याही कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना समाविष्ट करून घेतले नाही. मात्र आज हक्क सांगण्यासाठी आंदोलन करत आहेत हे योग्य नाही. तालुक्यामध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आलेत भविष्यातही ते अपक्ष म्हणूनच राहतील अशी त्यांची भूमिका असल्याचे मत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले. आमच्या कार्यालयावर कोणत्या हक्काने मोर्चा काढता असा सवालही त्यांनी विचारला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, अजून कोणतेही धोरण ठरलेले नाही. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मागे जनता उभी आहे. आज ज्या पद्धतीने मोर्चा काढला झटापट झाली हे अत्यंत चुकीचे आहे. यड्रावकरांनी शिवसैनिकांना खूप मदत केली आहे. शिवसेनेचा विकास त्यांनी गेली अडीच वर्षात केला आहे. गोकुळ, के.डी.सी मध्ये शिवसैनिक कसे निवडून येतील यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले असल्य़ाचे त्यांनी सांगितले.
Related Posts
Add A Comment