sanjay Raut On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी नॅनो असून कालचा विराट मोर्चा त्यांना नॅनो दिसत असेल तर त्यांना दिल्लीला गेल्यावर गुंगीचे इंजेक्शन दिलं असेल आणि त्याची गुंगी अजुन उतरली नसल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कालचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या शक्ती विरोधात होता, आणि या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी सामोर जायला पाहिजे होतं असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची अवहेलना फार करून घेऊ नये असा सल्लाही राऊत यांनी दिला.त्यांच राजकीय भविष्य मोठं होऊ शकतं. त्यांच्याकडे ती क्षमता असल्याच सांगत खोचक टोला लगावला. सध्याच्या सरकारने सूर्यावर धुंकण्याचा प्रयत्न केला असून हे जनतेला मान्य नाही. जनतेने राज्यपालांना डिसमिस केलं असून हीच जनता आता सरकारला देखील डिसमिस करेल.
Trending
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोराला कंठस्नान
- तांत्रिक बिघाडामुळे चामराजनगरजवळ कोसळले प्रशिक्षण विमान