Sanjay Shirsat on Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय शिरसाट यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. माझा शब्द आर्थिक घोटाळा या अर्थानं होता असे स्पष्टीकरण देतानाच चांगलं गेस्ट हाऊस असताना फाईव्ह स्टार हॉटेलची गरज काय? असा टोलाही लगावला.
काय म्हणाले होते संजय शिरसाट
सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा करत उपरोधिक टोलेबाजी करतात. दरम्यान याच मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंवर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली.’तिने काय-काय लफडी केली, हे…’ तु हाय कोण.अख्ख आयुष्य शिवसेने आम्ही घालवलयं आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार का असा सवालही त्यांनी एका भाषणा दरम्यान केला. त्यांच्या या वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.