औंध प्रतिनिधी
बल्गेरिया (युरोप) येथे ऑलम्पिक दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी कडेपूरचे सुपुत्र भारतीय खेल प्राधिकरण खेल मंत्रालयाच्या वतीने कांदिवली (मुंबई) येथील साई नँशनल सेंटर आँफ एक्सलेस (NCOE) सेंटरचे कुस्ती प्रशिक्षक अमोल अशोक यादव यांची निवड झाली आहे.
अधिक वाचा- राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलं पदक मराठमोळ्या तरुणाचं, सांगलीच्या संकेत सरगरने पटकवलं रौप्य
बल्गेरिया येथे 31 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत ऑलम्पिक दर्जाचे प्रशिक्षण वर्ग होणार आहे. कांदिवली कुस्ती केंद्रातील प्रशिक्षक म्हणून जबाबदारी यादव यांनी घेतल्यानंतर आतापर्यंत केंद्रातील मल्लांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कामाची दखल भारतीय खेल प्राधिकरणाने घेतली आहे. जगभरातील प्रशिक्षक आणि मल्ल या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक अमोल यादव यांची झालेली निवड महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी गौरवशाली गोष्ट आहे.
या प्रशिक्षणामुळे कुस्ती स्पर्धात्मक व जागतिक दर्जाची होण्यास मदत होईल.अनेक होतकरू मल्लाना लाभ होईल असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. यादव यांच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिनकर सुर्यवंशी,उत्तमराव पाटील, ज्ञानेश्वर मांगडे, कांदिवली केंद्राच्या रिजनल डायरेक्टर सुष्मिता ज्योतिषी, कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.