Satej Patil on Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातने पळवल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काल शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय वर्तुळात या प्रकल्पाचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनीही तीन ट्विट करत शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केल्याचे म्हटले आहे.
सतेज पाटील ट्विट करत काय म्हणाले,
धक्कादायक! महाराष्ट्रात होणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीची संयुक्त भागीदारी असलेला १ लाख ५८ हजार कोटींचा देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर उत्पादनाचा प्रकल्प सध्याच्या ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला आहे.वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारी असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण होता. हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये करण्याबाबत जवळपास निश्चित झाले असताना आणि याबाबत सर्व स्तरावर चर्चा झाली असताना अचानक हा प्रकल्प गुजरातला जाणे अत्यंत धक्कादायक आहे.
भविष्याच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी असून महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने आज केले आहे. असे ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले आहे. तर या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारनं प्रयत्न केले होते, असा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Previous Articleज्येष्ठ विधीज्ञ ऍड.धैर्यशील पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
Next Article विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Related Posts
Add A Comment