ऑनाईन टीम/तरुण भारत
प्रशासकीय मान्यतेबद्दल अनेक वर्ष थेट पाईपलाईनचे काम रखडले होते. यंदा पावसाचा कालावधी वाढल्याने थोडं काम थांबलं. पण आता 85 टक्के काम झाले आहे. कुठं राहिले असेल तर लगेच करता येईल. पण जिथे अडचण आहे तिथे मी सांगेन. पण काम पूर्ण करण्याचे सांगितले जाईल, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षसतेज पाटील (Former State Home Minister Satej Patil) यांनी दिली. थेट पाईपलाईनवरून ते कोल्हापुरात बोलत होते.
नक्की पहा Video- माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांची भाजप वर टीका
राज्यातील सरकारची मानसिकता ही राज्याला मागे घेउन जाण्याची आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे राजकीय वजन कमी पडत आहे. हे सरकार केवळ घोषणा करतंय. हे रोजगार देऊ शकणार नाही. बेरोजगार तरुणांच्या ते लक्षात येत आहे. देशातील सरकार हे एका राज्यासाठी चालवले जातंय का? केवळ निवडणूक आहे म्हणून घोषणा केल्या जातात का? असे सवाल सतेज पाटील यांनी केले. देशातील आर्थिक राजधानी मुंबईचा केंद्रबिंदू हा गुजरातला घेउन जाण्याचा भाजपचा हेतू आहे. अनेक उद्योग गुजरातला नेवून तो स्वतंत्र देश करायचा आहे का? असा सवाल करत माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी करत असा प्रयत्न म्हणजे इतर राज्यावर अन्याय असल्याचे म्हंटले आहे.

हे ही वाचा : ठाकरे गटाच्या शिवसेनेची दौड- मशालीची यात्रा जाणार बेळगावला
बच्चू कडू (MLA Bachhu Kadu) हा कार्यकर्ता चळवळीतील व प्रामाणिक आहे. दिव्यांग आणि मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आहे. राणा दाम्पत्यानी केलेल्या आरोपाचे सत्य बाहेर आले पाहिजे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या राजकीय कारकीर्द यांच्या अस्तित्वसाठी महत्वाचा विषय आहे. शिंदे सरकारमध्ये अस्वस्था आहे. सरकार मध्ये राहूनच बदनामी होत असेल तर टोकाचा निर्णय घेण्याचे त्यांना वाटले असेल, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.