बाबुराव पुसाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकमान्य रंगमंदिरात संगीत कार्यक्रम : रसिकांना मिळाला अप्रतिम असा स्वरानंद

प्रतिनिधी /बेळगाव
अवघा रंग एकची झाला,
स्वर वर्षावाने रसिक तृप्त झाला,
याची प्रचिती ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर व मंजुषा पाटील यांच्या गायकीने दिली. लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या ‘अभंगरंग’ संगीत कार्यक्रमात त्यांनी अभंग, गवळण, जोहार आदी रचना उत्कटपणे सादर केल्या आणि रसिकांना अप्रतिम असा स्वरानंद दिला. बाहेर पडणाऱया पावसाच्या सरींपेक्षा सभागृहात साकारलेल्या या स्वरांच्या सरींनी रसिक तृप्त होऊन सभागृहाबाहेर पडताना दिसत होते.
उद्योजक विजयराव पुसाळकर यांच्या वडिलांच्या म्हणजेच बाबुराव पुसाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकमान्य सोसायटीच्या सहकार्याने ‘अभंगरंग’ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये आरती अंकलीकर-टिकेकर व मंजुषा पाटील यांनी विठ्ठलावरील विविध रचना सादर करून स्वरांची ही दिंडी श्रोत्यांपर्यंत पोहोचविली.
विविध रचना सादर
‘अभंगरंग’ची सुरुवात ‘राम कृष्ण हरी’ या रचनेने झाली. त्यानंतर श्रीमन् नारायण, श्रीपाद शरणू ही रचना सादर झाली. मंजुषा यांनी ‘पाहावा नयनी’ तर आरती अंकलीकर यांनी ‘तानी स्वर भिजविला’ ही रचना सादर केली. ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी’ या मंजुषा यांच्या सादरीकरणानंतर आरती यांनी ‘या पंढरीचे सुख पाहता डोळा’ ही रचना सादर केली. ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ या रचनांच्या सादरीकरणानंतर मंजुषा यांनी ‘जोहार माय बाप जोहार’ सादर केला. ‘अवघा रंग एकची झाला’ या भैरवीने अभंगरंगची सांगता झाली.
एक परिपूर्ण स्वरमैफल
दोन्ही दिग्गज गायिका, स्वरावरील त्यांची विलक्षण हुकूमत, अप्रतिम अशा आलाप आणि तानांचा आविष्कार यामुळे खूप दिवसांनंतर एका परिपूर्ण अशा स्वरमैफलीचा आनंद रसिकांनी घेतला. त्यांना प्रशांत पांडव यांनी तबल्याची, अभिषेक शिणकर यांनी संवादिनीची, प्रथमेश ताळकर यांनी पखवाजची तर आदित्य आपटे यांनी मंजिरी टाळवाद्याची साथ तितक्मयाच प्रभावीपणे केली. या रंगलेल्या ‘अभंगरंगमध्ये गोविंद भगत यांनी नेटक्मया आणि मोजक्मया निवेदनाने रंग भरले.
प्रारंभी लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर, उद्योजक विजय व शंतनु पुसाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अंतर्गतच मंजुषा यांनी काणेबुवा प्रति÷ानतर्फे चालविल्या जाणाऱया गुरुकुलाची तर आरती अंकलीकर यांनी आपल्या गुरु गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. वीणा संत यांच्या हस्ते गायिकांचा तर उद्योजक राम भंडारे यांच्या हस्ते वादक तसेच दोन्ही गायिकांच्या शिक्षा, सरगम चन्नाळ, अनुराधा मांडलिक, रसिका पैठणकर, अनुष्का साने व ध्वनी संयोजक गुरु पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. निहारिका पुसाळकर यांनी आभार मानले.