प्रतिनिधी/ बेळगाव
महाशिवरात्रीनिमित्त माजी मंत्री व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठाला भेट दिली. यावेळी मठाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्षही असणारे सतीश जारकीहोळी यांचे आगमन झाले. श्री.म.नि.प्र. गुरुबसवलिंग स्वामीजींचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर मठाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी दुरदुंडेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी मलगौडा पाटील, ग्राम पंचायत अध्यक्षा रेखा सुतार, माजी अध्यक्ष व सदस्य राजू मायाण्णा, गजानन कागणीकर, दत्ता सुतार, कल्लाप्पा शिंगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश जारकीहोळी यांनी शिवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या भजनाचाही आस्वाद घेतला. काहीकाळ बसून त्यांनी भजन ऐकले.