Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजती तांबे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.आज तांबे यांनी एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होतो आणि अपक्ष म्हणूनच भविष्यात काम करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेस परिवारामध्ये वाढलो आहे, पण मला पक्षांतर्गत मत मांडण्याची संधी न देता माझ्याविरोधात नेहमी वक्तव्य केली गेली, त्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिला नाही असं सत्यजीत तांबे म्हणाले. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण यापुढे अपक्ष म्हणून काम करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं.
माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला,पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवाल तांबे यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही,चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.
Previous ArticlePhoto : भारतात केरळचा ट्रान्समेल जहाद होणार आई, फोटो व्हायरल
Related Posts
Add A Comment