स्वच्छतागृहात घसरून पडल्यानंतर इस्पितळात दाखल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन गुऊवारी सकाळी तिहार कारागृहातील वॉशरूममध्ये घसरून पडले. स्वच्छतागृहात कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले असून सकाळी त्यांना दीनदयाळ उपाध्याय ऊग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लोकनारायण जय प्रकाश ऊग्णालयात (एलएनजेपी) हलवण्यात आले. त्यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे तिहारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. सत्येंद्र जैन गुऊवारी सकाळी 6 वाजता तिहार तुऊंग क्रमांक 7 च्या वैद्यकीय तपासणी कक्षाच्या बाथरूममध्ये घसरून पडले. त्यानंतर त्यांना बऱ्याच वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशक्तपणाच्या तक्रारीनंतर त्यांना येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. सुऊवातीच्या चाचण्यांमध्ये त्यांचे अवयव योग्य प्रकारे काम करत असल्याचे दिसून आले, परंतु जैन यांनी आपल्या पाठीत, डाव्या पायात आणि खांद्यामध्ये वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आठवडाभरात जैन यांना ऊग्णालयात आणण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 22 मे रोजी त्यांना दिल्लीतील सफदरजंग ऊग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मणक्मयाचा त्रास होऊ लागला. 20 मे रोजी देखील याच त्रासामुळे त्यांना दीनदयाळ ऊग्णालयात आणण्यात आले होते.