Eknath Shinde: पंचमहाभूत लोकोस्तावाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महाराष्ट्राच्या भूमीत हा लोकस्तव होतोय याचा आम्हाला अभिमान आहे. नदीला,मातीला माय म्हणणारा आपला देश आहे. नैसर्गिक संकट टाळयाचे असेल तर पंचमहाभूत टिकवण्याची गरज आहे.
सेंद्रिय खताला सबसिडी द्यायचा विचार राज्यसरकार करेल, यात सरकार मागे राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पृथ्वीला वाचवायचे असेल तर पंचमहाभूत स्वीकारा असे आवाहन ही त्यांनी केले. आज कणेरीमठावर सुमंगलम पंचमहाभूत लोकोस्तव उदघाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज जागृत नाही झालो तर उद्या जगणार नाही,उद्याची पिढी सुद्धा जगणार नाही,काही शिल्लक राहणार नाही, निसर्गासोबत जगण्याची मानवता आहे,ही पूर्वज्जानी जाणले होते. जी भूमी आपल्याला सर्वकाही देते, ती आज नष्ट होतेय.आम्ही वसुदैव कुटुंबकम ही संस्कृती पुढे घेऊन जात आहोत.भारतीय संस्कृतीत पर्यावरणाला आपले माय बाप मानलेत, ज्यांनी ह्या संस्कृतीला बगल दिला त्या देशाची अवस्था काय झाली हे तुमच्या डोळ्यासमोर आहे.पाणी ,हवा ह्या फक्त हॉटेलमध्ये बसून बोलायच्या गोष्टी नाही, त्यावर शास्वत विचार झाला पाहिजे.आज भारत कँसर कॅपिटक सिटी बनत आहे, त्याला वेळीच आवर घातला पाहिजे.यासाठी राज्य सरकार 25 लाख हेक्टर नैसर्गिक शेती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना भविष्यात सोलर वीज देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
पंचगंगेच प्रदूषण वाढले, तिला गंगा म्हणायचे का?असा सवालही त्यांनी यावेळी केला.
भविष्याचा वेध घेणारा हा लोकोस्तव आहे.सर्वांनी तो पाहावा असे आवाहन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केले. राज्य सरकार आणि पर्यावरण विभाग नेहमीच चांगल्या कामासाठी पुढाकार घेईल असेही ते म्हणाले.
Previous Articleवाढते खाजगीकरण हे धोकादायक…सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा उर्जीत करण्याची गरज : शरद पवार
Next Article लांबसडक केसांसाठी फायदेशीर असणारी शिकेकाई
Related Posts
Add A Comment