सावित्रीबाई फुले महिला मंडळ गोवातर्फे आयोजन
प्रतिनिधी/ पणजी
सावित्रीबाई फुले महिला मंडळ, गोवातर्फे भारत देशाची प्रथम अध्यापिका वंदनिय युग स्त्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जंयती कार्यक्रम, मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता आझाद भवन, सभागृह पर्वरी’’ येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोवा हस्तकला आणि लघुउद्योग विकास महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर, खास आमंत्रित म्हणून रिपब्लकिन पार्टी ऑफइंडिया (आठवले) गोवाचे प्रभारी सतीश कोरगांवकर, प्रमुख वक्ता म्हणून रिजनल डायरेक्टर सेंट्रल बोर्ड ऑफ वर्कर्स एडोकेशनच्या
श्रीमती अरुणा विष्णू वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संबोधी ट्रस्ट गोवाचे मुख्य समन्वयक डॉ. उल्हास चांदेकर, सन्मानीय पाहुणे म्हणून विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवाचे अध्यक्ष आयु. बाबलो आगरवाडेकर, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, गोवाच्या अध्यक्षा वासंती परवार, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.