ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Section 144 applicable in Chandni Chowk area मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यातील चांदणी चौकात असलेला जुना पूल आज मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर चौक परिसरात दुपारी 4 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली.
देशमुख म्हणाले, आज मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईहून साताऱ्याकडे आणि साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक रात्री 8 नंतर थांबवण्याचे काम सुरू होईल. सांयकाळी 6 वाजल्यानंतर परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात होईल. लवकरात लवकर हा पूल पाडून नागरिकांना गैरसोय होणार नाही हा प्रयत्न आहे.
अधिक वाचा : Pune : सराईत गुंड अजय विटकर टोळीविरूद्ध मोक्का
चांदणी चौक परिसरात दुपारी 4 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पुलाच्या पाडकामावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरुन बंदी घालण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता वाहतूक सुरू होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.