Karnataka Border Dispute : रेणुका यात्रेसाठी सौंदत्ती डोंगरावर महाराष्ट्रभरातून आलेल्या एस टी बसेसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र एस.टी महामंडळच्या अधिकाऱ्यांनी सर्व बसेस सुरक्षित ठिकाणी लावत बंदोबस्त ठेवला आहे. एस.टी महामंडळच्या कोल्हापूर विभागाच्या एकूण 145 बसेस रेणुका यात्रेसाठी सौंदत्ती डोंगरावर पाठवण्यात आल्याची माहिती कोल्हापूर एस. टी महामंडळ विभागाचे वाहतूक निरीक्षक शितलकुमार चिखलव्हळे यांची दिली.
महाराष्ट्रातील सीमा भागातील समन्वयक मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्यानंतर कर्नाटकातील कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली.दगडफेकीनंतर दोन्ही राज्यातून बससेवा बंद करण्यात आली होती.दरम्यान महाराष्ट्राने धाडस करत 24 तासानंतर कोल्हापुरातून कर्नाटकात बससेवा आज सकाळी सुरू केली.निपाणी,संकेश्वर,हत्तरगीसह सर्व थांबे घेऊन बस बेळगावमध्ये पोहचणार होती.पण बस निपाणीपर्यंत पोहचली मात्र सुरक्षेततेच्या कारणास्तव ही बससेवा पुन्हा बंद करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्याने पुन्हा बससेवा बंद करण्यात आली.तर रेणुका यात्रेसाठी सौंदत्ती डोंगरावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Previous Articleभाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली; दिल्ली महापालिकेत ‘आप’चे सरकार
Related Posts
Add A Comment