बेळगाव : चेन्नई येथे 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बेळगावचे ज्ये÷ बुद्धिबळपटू आकाश मडिवाळर यांची या स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. आकाश मडिवाळर हे बेळगावचे ज्ये÷ मानांकित बुद्धिबळपटू असून ते वरि÷ राष्ट्रीय आर्बिट्रेटर आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत चमक दाखविली आहे. त्यानंतर त्यांनी 1 ते 16 वर्षांपर्यंतच्या अनेक होतकरु बुद्धिबळपटूंना प्रशिक्षणही दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून चेन्नई येथे होणाऱया ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. 190 देशातील 1750 बुद्धिबळपटू या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
21 ते 11 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा चेन्नई येथे होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघनेच्यावतीने त्यांचा खास गौरव करुन शुभेच्छा देण्यात आल्या.