शिरोडा : पंचवाडी शिरोडा येथील अवधूत नाईक यांची गोवा राज्य अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाच्या अकरा संचालक मंडळामध्ये त्यांचा समावेश असून तसे नियुक्तीपत्र नुकतेच समाज कल्याण खात्यातर्फे त्यांना पाठविण्यात आले आहे. अवधूत नाईक हे शिरोडा भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. शिरोडा भाजपाचे ते माजी अध्यक्ष असून विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत.
Previous Articleआग विझवण्यासाठी वावरलेल्यांचे आमदार गणेश गावकरनी मानले आभार
Next Article ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.