Satara News : साताऱ्याचे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. धैर्यशील पाटील यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांचे वडील होतं. त्यांचे राजमाता कल्पनाराजे, खासदार उदयनराजे यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. ते सातारा म्युन्सिपल कामगार युनियनचे अध्यक्ष होते. कामगारांच्या हितासाठी त्यांनी चळवळ वाढवली होती. फौजदारी वकिलीत निष्णांत अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने साताऱ्याला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. त्यामुळे संपूर्ण सातारा शहर शोकसागरात बुडाला आहे.
सातारा शहरातील प्रख्यात कायदेपंडित म्हणून ऍड. डी.व्ही उर्फ धैर्यशील पाटील यांची ओळख आहे. त्यांनी अनेक फौजदारी गुह्यात प्रभावीपणे बाजू मांडून निकाल खेचून आणणारच अशी त्यांची ओळख होती.जन्म- १४ जुलै १९४३ चाते १२ वर्ष बार कौन्सील ऑफ इंडियाचे सदस्य होते. १९ वर्ष महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य होते. कराडच्या कृष्णा युनिव्हसिर्टीचे संचालक होते. तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कायदेविषयक शिक्षण समितीचे सदस्य होते. त्यांनी भारताची युएस आणि नेपाळसोबत झालेल्या शिबिरात सहभाग घेतला होता. त्यांनी कामगारांच्या हितासाठी कायदेशीर मार्गाने व चळवळीच्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले. सातारा म्युन्सिपल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संपूर्ण सातारा शोकसागरात बुडाला असून त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५ वाजता त्यांच्या घरातून निघणार आहे.
Related Posts
Add A Comment