नवी दिल्ली : मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी सीरियल किलर रविंद्र कुमारला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुनील कुमार यांच्या न्यायालयाने रविंद्रला ही शिक्षा सुनावली आहे. 2008-2015 दरम्यान सुमारे 30 मुलींसोबत क्रौर्य केल्याची कबुली आरोपी रविंद्रने पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली होती. 2008 मध्ये इंग्रजीतील भयपट पाहून रविंद्रमधील सैतान जागा झाला होता. चित्रपट पाहिल्यावर त्याने पहिला गुन्हा केला होता. 2015 मध्ये त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा उलगडा झाला होता. स्वत:चे गुन्हे कबूल करणारा रविंद्र मुलींना ठार केल्यावर त्यांच्या मृतदेहांवरही अत्याचार करत होता. रविंद्र प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुलींना लक्ष्य करत होता. रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मुलामुलींना तो उचलून नेत होता असे आढळून आले होते. काही प्रकरणांची सुनावणी अजून पूर्ण झालेली नाही.
Previous Articleमहागाईविरुद्धचे युद्ध संपलेले नाही!
Next Article मान्सून अंदमानात रेंगाळला
Related Posts
Add A Comment