पुणे / वार्ताहर :
धानोरीत अफीम बोंडाचा चुरा (दोडाचुरा) विक्री करण्यासाठी आलेल्याला एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 82 हजार रुपये किंमतीचा 7 किलो दोडाचुरा जप्त करण्यात आला.
करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (38, रा. धानोरी, पुणे मुळगाव-मुं. दुरासनी, तहसिल सोजत, जि- पाली, राज्य राजस्थान) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक दोन धानोरी परिसरात पेट्रोंलिग करीत होते. त्यावेळी एकजण अफीमच्या बोंडाचा चुरा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून करणसिंहला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 06 किलो 790 ग्रॅम अफीमच्या बोंडाचा चुरा जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण आदींनी ही कारवाई केली.
अधिक वाचा : दहावी-बारावी परीक्षा आता जुन्याच पद्धतीने