Shahuwadi Malkapur News : मलकापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेला मलकापूर उचत मार्गावरील पशुवैद्यकीय दवाखाना अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला असून, या स्वच्छतेकडे लक्ष देणार कोण? असा प्रश्न पशुपालकांच्यातून उपस्थित होत आहे. तसेच विद्युत खांबांना ही वेलांचा वेडा पडला आहे.
शेतकरी बांधवांचा आधारवड म्हणजेच पशुधन याच पशुधनाला आरोग्यसेवा सुरळीत आणि चांगली मिळावी यासाठी मलकापूर उचत मार्गावर लहीन येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र, आज हा पशुवैद्यकीय दवाखाना अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे.
मलकापूर पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील अनेक पशुपालक या ठिकाणी आपल्या जनावरांना औषधोपचार करण्याबरोबरच विविध कारणासाठी येत असतात. मात्र या ठिकाणचा परिसर हा कायमच अस्वच्छतेमुळे चर्चेत आला आहे. मुख्य रस्त्यालगत रहदारीच्या मार्गावर असणाऱ्या व आजूबाजूला नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी अशी असलेली अस्वच्छता आरोग्याच्या दृष्टीनेही तितकीच धोकादायक आहे. यावर संबंधित विभागाबरोबरच ग्रामपंचायतीनेही याबाबत दखल घेऊन तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह पशुपालकांच्यातून येऊ लागली आहे.
Previous Articleविमानतळाच्या धावपट्टीवर आरेखन
Next Article सोने-चांदीच्या अलंकारांनी सजणार गणराया
Related Posts
Add A Comment