समांथा रुथ प्रभूचा बहुप्रतीक्षित चित्रपट
दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कुठल्या न कुठल्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. समांथाने नोव्हेंबर महिन्यात मायोसायटिस आजाराबद्दल खुलासा केला होता. अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी समांथा रुथ प्रभू ही स्वतःचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शांकुतलम’मुळे चर्चेत आहे. तिच्या या तेलगू चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले असून प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
‘शांकुतलम’वर या चित्रपटाचे नवे पोस्टर समांथाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यात ती अभिनेता देव मोहनसोबत दिसून येत आहे. देव मोहन या चित्रपटात दुष्यंत ही भूमिका साकारत आहे. ‘ऐतिहासिक प्रेमकथा पाहण्यासाठी सज्ज व्हा, शांकुतलम 17 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय’ असे समांथाने म्हटले आहे.

समांथा अन् देव मोहन यांचा हा चित्रपट केवळ तेलगू नव्हे तर अन्य भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. 3डी मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मल्याळी, कन्नड, तमिळ आणि हिंदीत हा चित्रपट झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू आराहा अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. शांकुतलम या चित्रपटात मोहन बाबू, अदिति बालन, प्रकाश राज, गौतमी मधू, जिस्शुसेन गुप्ता आणि कबीर बेदी यांच्यासह अनेक कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे.