मुंबई
औषध क्षेत्रात कार्यरत दिग्गज कंपनी सिप्लाचे समभाग सध्याला नीचांकावर असल्याचे पाहायला मिळत आहेत. सदरचा समभाग बीएसईवर 2.47 टक्के इतका घसरत 857 ऊपयांवर आला होता. याआधीच्या सत्रात सदरचा समभाग 875 ऊपयांवर बंद झाला होता. कर चुकवेगिरीसंबंधी प्राप्तीकर विभागाने कंपनीची चौकशी चालवली असल्याचे सांगितले जात आहे. याचाच नकारात्मक परिणाम समभागावर दिसतो आहे.