वृत्तसंस्था/ मुंबई
वरुण बेव्हरेजेसचा समभाग शेअरबाजारात जवळपास 5 टक्के इतका वाढला असल्याचे दिसून आले आहे. कंपनीचा समभाग बुधवारी 5 टक्के इतका वधारत 1378 रुपयांवर पोहचला आहे. याआधी 12 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या समभागाच्या भावाने 1432 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. वरुण बेव्हरेजेसला आगामी काळात सॉफ्टड्रिंक्सच्याबाबतीत चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे.