नाटोली येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार व याबाबत घरात सांगू नये अन्यथा भावास जीवे मारण्याची धमकी देत ३ लाख रुपये पीडित मुली कडून खंडणी दोघांना अटक
शिराळा : वार्ताहर
नाटोली ( ता.शिराळा) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार व याबाबत घरात सांगू नये अन्यथा भावास जीवे मारण्याची धमकी देत ३ लाख रुपये पीडित मुली कडून खंडणी घेतल्या प्रकरणी राजू गुंडा वारे (वय ३४ रा.नाटोली ), गणेश लक्ष्मण महापुरे ( वय २२) , रा. सरुड (ता . शाहूवाडी, जि . कोल्हापूर) या दोन्ही संशयितांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात उभे केले असता त्यांना दि.३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक वाचा- शिराळ्यात अपघात,१ जण जागीच ठार,पाच जखमी https://tarunbharat.com/sangli-shirala-city-road-accident-one-death/
याबाबत पीडित मुलीने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये गणेश महापुरे याने वर्षापासुन आज पर्यंत जोतिबा ( ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर) मंदीराच्या पायथ्याशी असलेल्या लॉजवर , तसेच राजू वारे याने सागाव येथील दुर्गामातेचे मंदीर जवळ जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले होते.
गणेश महापुरे बरोबर असणारे प्रेमसंबंध घरच्यांना सांगेन अशी धमकी देऊन पीडित मुलीवर संशयित राजू वारे याने ही बलात्कार केला. या दोघा संशयितांनी या पीडित मुलीकडून वारंवार पैशाची मागणी करत वेळोवेळी मुलीकडून तीन लाख रुपये खंडणी घेतली. याच बरोबर हे प्रेमसंबंध घरी सांगितलेस तर तुझ्या भावाला ठार मारीन अशी धमकी दिली. या घटने बाबत बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक , बलात्कार ,खंडणी वसुली चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना राहत्या घरातुन पहाटे चार च्या दरम्यान सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अविनाश वाडेकर , दीपक हांडे ,विनोद पाटील , बाबुराव पाटील , महेश साळुंखे , गणेश झंझारे यांच्या पथकाने अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार हे करीत आहेत.