Shiv Sena Vs Shinde Group : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र कोर्टाचा निर्णय येण्याआधीच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर मोठं विधानं केलं आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हि माहिती दिली.
विशेष म्हणजे ४०आमदार आणि १६ शिवसेना खासदारांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आल्याचं सत्तार म्हणाले आहेत.
सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शिंदे गटाचे सर्व खासदार, आमदार जिल्हाप्रमुख आणि पदअधिकाऱ्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचं सत्तार यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख कोण असणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र याबाबत आज पहिल्यांदाच शिंदे गटाकडून खुलासा करण्यात आला आहे.
Previous Articleविणकाम हस्तकरागीरीवर पणजीत कार्यशाळेचे उद्घाटन
Next Article इब्रामपूर येथे आज विष्णू गवस यांचे किर्तन
Related Posts
Add A Comment