‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष : अवघे वातावरण शिवमय, डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई : शिवप्रेमींची उपस्थिती
प्रतिनिधी /संकेश्वर
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात सोमवारी रात्री 7 वाजता संकेश्वरात शिवजयंती मिरवणूक जल्लोषात पार पडली. प्रारंभी नदी गल्ली येथे शिवरायांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीला सुरुवात झाली.
नदी गल्ली, गांधी चौक, मठ गल्ली, नेहरु रोड, सुभाष रोड, खाटीक गल्ली, संसुद्धी गल्ली, मड्डी गल्ली, अंकले वेस, चन्नम्मा सर्कल, शिवाजी चौक या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान सर्व मार्गांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते. अवघे वातावरणच शिवमय झाले होते. रात्री 7 वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीची मध्यरात्री 2 वाजता शिवाजी चौकात सांगता झाली. मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर मोठय़ा संख्येने तरुण प्रत्येक गाण्यावर थिरकताना दिसत होते.
या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, संजय शिरकोळी, अमर नलवडे, अभिजित कुरणकर, जयप्रकाश सावंत, नंदू मुडशी, रोहन नेसरी, नगरसेवक गंगाराम भुसगोळ, राजेंद्र बोरगावी, दीपक भिसे, सचिन मोकाशी, संतोष पाटील, प्रशांत कदम, महादेव डावरे, ओंमकार मन्यागोळ, अक्षय खाडे, जयप्रकाश कदम, गजानन मोकाशी, राजू शिंदे, आप्पा पाटील, वैभव शिवणे, राजू बांबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.