Health Tips : जिना चढताना अनेकांना दम लागतो. अगदी चार- सहा पायऱ्या चढल्या तरी दम लागतो. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळते.बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या निर्माण होत आहे.आरोग्याच्या बाबतीत आपले अज्ञान असेत. यामुळे अशक्तपणा जाणवू लागतो. आणि मग याचमुळे थकवा जाणवू लागतो. हा त्रास आपल्या होवू नये म्हणून यावर उपाय काय करावे यासाठी आज आपण टिप्स जाणून घेणार आहोत.
-ज्या लोकांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते. ही समस्या सहसा अशा लोकांमध्ये आढळते.त्यामुळे आपल्या आहारात पौष्टिक अन्नाचा समावेश करा. ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि पायऱ्यांवर चालताना दम लागणार नाही.
-नियमितपणे भरपूर झोप घ्या. कमी झोपेमुळेही थकवा जाणवतो आणि ही समस्या उद्भवते.
-वाढत्या वजनामुळे तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागतो. लठ्ठपणामुळे पायऱ्या चढतानाही श्वास घेण्यास त्रास होतो.
-व्यायाम आणि योगासने नियमित करा. तेलकट पदार्थ खाणे टाळा, हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.
-सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. बराच वेळ झोपल्यानंतरही ही समस्या उद्भवते.
-तब्येत चांगली असूनही जर तुम्हाला ही समस्या होत असेल तर काही अंतर्गत आजाराचे लक्षण देखील असू शकते.
-शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवते. डिहायड्रेशनच्या समस्येमुळे पायऱ्या चढताना दम लागतो. भरपूर पाणी प्या, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज नारळ पाणी आणि फळांचा रस देखील घेऊ शकता.
-तणावामुळे दोन-चार पायऱ्या चढून गेल्यावरही दम लागतो. त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
-अनेक वेळा शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागतो, त्यामुळे तुमची नियमित तपासणी करत रहा.
Previous Articleउपक्रमशील शिक्षक म्हणून संतोष वैज यांना पुरस्कार प्रदान
Next Article अभिनेत्री वैशाली टक्करची आत्महत्या
Related Posts
Add A Comment