Amit Shah : 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संसद भवनात सेंगोल ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबरसंसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या ६० हजार कामगारांनी योगदान दिलं आहे,त्यांचाही यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी सन्मान करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.आज ते दिल्लीहून बोलत होते.
ज्या दिवशी संसद राष्ट्राला समर्पित केले जाईल, त्याच दिवशी तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हे सेंगोल देण्यात येणार आहे.त्यानंतर हे सेंगोल संसदेत कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे”, असेही अमित शाह म्हणाले.
सेंगोलविषयी सांगताना अमित शाह म्हणाले की, 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री पंडित जवाहरलाल यांनी तमिळनाडू येथून आलेल्या सेंगोलचा स्विकार केला. यासाठी संपूर्ण विधी करून त्याचा स्विकार केला होता. त्यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सत्ता हस्तांतराच्या प्रक्रियेला पूर्ण केलं होते.यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद होते. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय देण्यात आला त्यावेळी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल यांना विचारलं की, सत्ता हस्तांतरणाबाबत काय कार्यक्रम आहे? त्यावेळी सहकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो असे ते म्हणाले.
सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सी. गोपालाचीर यांनाही विचारले. यावेळी अभ्यासाअंती सेंगोलच्या प्रक्रियेला चिन्हित केलं गेलं. पंडित नेहरू यांनी पवित्र सेंगोलला तमिळनाडूहून मागवंल होतं. त्यानंतर इंग्रजांकडून सेंगोल राजदंड स्वीकारून सत्ता स्थापन केली होती.सेंगोल ज्यांना मिळतो त्यांना निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासन करणे अभिप्रेत असतं. हा राजदंड चोला साम्राज्याशी निगडीत आहे. तामिळनाडूच्या पुजाऱ्यांकडून यावर धार्मिक क्रिया करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य काळात हा राजदंड नेहरूंकडे सोपवण्यात आला होता. १९४७ नंतर या राजदंडाचा विसर पडला होता. १९७१ मध्ये तामिळनाडूच्या विद्वांनांनी हा राजदंड पुन्हा चर्चेत आणला होता. तर, २०२१-२२ मध्ये भारत सरकारने याविषयी माहिती केली होती. महत्त्वाचं म्हणजे १९४७ साली तमिळचे जे विद्वान उपस्थित होते ते २८ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमातही उपस्थित राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अमित शाहांनी दिली.