Shri Dev Patekar Panchayat Devasthan’s birthday today
तिरोडा( सावंतवाडी ) खासेवाडी येथील श्री देव पाटेकर पंचायतन देवस्थानचा वाढदिवस आज 27 जानेवारीला होत आहे .यावेळी रात्री आठ वाजता पुत्र वाहीला नवसाचा हा पारसेकर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग होणार आहे .तत्पूर्वी सात ते साडेसात वाजता श्री देव भवानी शंकर महाराज यांचे मार्गदर्शन होणार आहे. वाढदिवसानिमित्त दुपारी एक ते दोन या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता तीर्थप्रसाद तसेच श्री देव पाटेकर तरुण मंडळाचे भजन ,संध्याकाळी सहा ते साडेसात वाजता फटाक्यांची आताषबाजी होणार आहे .तिरोडा खासेवाडी येथील श्री देव पाटेकर पंचायतन देवस्थान पटांगणासमोर हे कार्यक्रम होणार आहेत .या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन भोसले कुटुंबीयातर्फे तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी