वार्ताहर /माशेल
प्रियोळ भाजपा मंडळातर्फे माशेल येथील भाजपा कार्यालयात श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा मंडळ प्रमुख दिलीप नाईक यांनी श्यामा प्रसाद यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित भाजपा कार्यकर्त्याचे स्वागत करून श्याम प्रसादाच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच प्रियोळ मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख अरुण भोसले, भावना नाईक, सत्यवान शिलकर यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी जयेश नाईक, अनिशा गावडे, अपूर्वा भोसले, विनीत कुंडईकर, घनिषा नाईक, अशोक नाईक, संतोष भगत, सर्व भाजपा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. उर्वेश रेडकर यांनी आभार मानले.